Tuesday, February 20, 2018

शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

दि.१९/०२/२०१८
आज शिवाजी महाराज जयंती निमित्ताने  सकाळी 8 वाजता वडाळी देशमुख येथील छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याचे पूजन हे गावकरी यांनी केली व शिवजयंती निमित्य ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण केले यावेळेस पाणी फाउंडेशन समिती वडाळी देशमुख व गावकऱ्यांनी मोठया उत्साहात सहभाग दर्शवला व आजचा कार्यक्रम चांगल्या पध्दतीने पार पडला.

Sunday, February 18, 2018

वडाळी देशमुख येथील ग्रामपंचायत सुशोभीकरण उत्साह

18/02/2018
आज सकाळी पाणी फाउंडेशन ची टीम व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांच्या श्रमदानातून ग्रामपंचायत ची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात आले या वेळेस पाणी फाउंडेशनचे सदस्य अजय अडचूले,आशिष पाठक, श्याम वावरे,केशव भुस्कट,सचिन वाघ ,मयूर फुकट,आकाश बडेरे,सोपान डवाले,रितेश गुप्ता, दिलीप वाहूरवाघ  तसेंच सरपंच मालाबाई वाहूरवाघ,  उपसरपंच वैशालीताई काळे  ,सदस्य रवींद्र घटोळ, तसेच तंटामुक्तीअद्यक्ष अशोक मोहोकार उपस्तीत होते

Saturday, February 17, 2018

वाडाळी देशमुख येथील स्वच्छता अभियान

दि.17/02/2018
आज सकाळी गावातील नेहरू युवा बहुउद्देशिय मंडळ तसेच गावातील तरुण वर्ग यांनी विद्यलय स्वच्छता तसेच गावात गाजर गवत निर्मूलन ,प्लास्टिक निर्मुलन या प्रकारचे सार्वजनिक कामात उत्साह दाखवला व तसेच गावातील सांडपाण्याची पाहणी व नियोजन केले या वेळेस मंडळाचे अध्यक्ष श्याम वावरे उपाध्यक्ष सागर हुसे साचीव केशव भुस्कट व आकाश बडेरे ,अजय अडचूले ,मयूर फुकट ,सचिन वाघ,अनिल काळे,आशिष पाठक, सोपान डवले,संतोष वावरे,ऋषिकेश गणगणे,विशाल प्रांजले इत्यादी उपस्तीत होते . कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने पार पडला.